दिव्यांग कल्याण विभागातील 1912 पदे भरण्यास मान्यता

WhatsApp Group

मुंबई : दिव्यांग कल्याण  विभागांतर्गत सर्व प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यात एकूण 932 अनुदानित दिव्यांग शाळा / कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहे कार्यरत आहेत. या  विभागात शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील 1912 पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

शिक्षकीय 1167 तसेच शिक्षकेतर 508 ही पदे नियमित स्वरुपात आणि 237 पदांना बाह्यस्त्रोताद्वारे अशा एकूण 1912 पदांना भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेच्या अनुषंगाने या उपक्रमांतील पदभरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देऊन या पदभरतीची कार्यवाही विभागामार्फत सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विभागाचा शासन निर्णय दि.26 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.