
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या हिंदी सलाहकर समिती (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय) च्या सदस्यपदी जाहिद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारचे नियुक्तीचे राजपत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले.
या नियुक्तीबद्दल केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब, आमदार नितेश राणे साहेब यांनी जाहिद खान यांचे अभिनंदन केले. गेली अनेक वर्षे जाहिद खान यांनी आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून हजारो गोरगरीब रुग्णांवर मोफत व अत्यल्प दरात रुग्ण सेवा देऊन अत्यंत महागड्या शस्त्रक्रिया नामांकित रुग्णालयात मोफत करून दिल्या आहेत.
तसेच भाजपच्या माध्यमातून बांद्रा पश्चिम विभागात त्यांचे सामाजिक कार्य हे सातत्यपूर्ण सुरू असते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सलाहकर समितीवर नियुक्ती करून केंद्र सरकारने त्यांचा गौरव केला आहे. याबद्दल समाजातील सर्व थरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.