नितीन नांदगावकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती

WhatsApp Group

मुंबई – सोशल मीडियावर आपल्या हटकेस्टाईलने प्रसिद्ध असलेल्या नितीन नांदगांवकर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी जबाबदारी दिली आहे. नितीन नांदगावकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नितीन नांदगांवकर यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

गरिबांच्या प्रश्नांना खळ-खट्याकने सोडविण्याची नितीन नांदगावकर यांची स्टाईल मनसेत असताना सर्वपरिचित झाली. आपले काम फेसबुकच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ते पोहोचले आहेत. तर, मुंबईतही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्याच्या आंदोलनावेळीही त्यांनी रस्त्यावर उतरुन थेट राणा दाम्पत्यास इशारा दिला होता.

नितीन नांदगावकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. राजकारणामध्ये काय कमावले असेल तर दमदार, विश्वासू भाऊ, बहिणी, मैत्रिणी सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाज, डॅशिंग नेते नितीन नांदगावकर, असं म्हणत रुपाली पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे.