महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाच्या तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती

WhatsApp Group

मुंबई: महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्री. माने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

या समितीच्या सदस्यपदी ॲड.राम आपटे, दिनेश ओऊळकर तर विशेष निमंत्रित म्हणून ॲड. र.वि. पाटील, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव हे विशेष निमंत्रित असून सीमा प्रश्न विषयी काम पाहणाऱ्या विभागाचे सचिव हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

Join our WhatsApp Group, Instagram, Facebook Page and Twitter for every update