मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचे अर्ज आजपासून स्वीकारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इ.१० वीच्या परीक्षांसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्र १८ नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने https://t.co/KX9sqYIXLT या संकेतस्थळावर घेतले जातील.तपशील खाली पहा. pic.twitter.com/e9xWJDM2rn
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 17, 2021
परीक्षेचे आवेदनपत्र १८ नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने http://mahahsscboard.in या संकेतस्थळावर घेतले जातील. असं ट्वीट वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी नियमित शुल्कासह अर्ज भरण्याच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी माहिती दिली आहे. तसेच ते म्हणाले की परीक्षांच्या तारखांची घोषणाही लवकरच केली जाईल.