SBI Clerk Recruitmen: SBI लिपिक भरतीसाठी अर्जाची तारीख वाढवली; आता या दिवसापर्यंत करा अर्ज, जाणून घ्या अर्जाची पद्धत

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँकेने SBI लिपिक भरतीसाठी अर्जाची तारीख वाढवली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

WhatsApp Group

 SBI Clerk Recruitmen: स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI लिपिक भरती 2023 साठी नोंदणीची तारीख वाढवली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांना अर्ज करण्याची शेवटची तारीख माहित असणे आवश्यक आहे. आता या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

परीक्षा कधी होणार?

या भरती मोहिमेद्वारे संस्थेमध्ये 8283 कनिष्ठ सहयोगी पदे भरण्यात येणार आहेत. प्राथमिक परीक्षा जानेवारी 2024 मध्ये आणि मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे.

पात्रता

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे दरम्यान असावी.

Railway Recruitment : तरुणांना नोकरीची मोठी संधी; रेल्वेत 3093 पदांसाठी भरती, असा करा अर्ज

अर्ज फी

GENRAL/OBC/EWS श्रेणीसाठी अर्ज शुल्क ₹750/- आहे. SC/ST/PWBD/ESM/DESM यांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी थेट लिंक

याप्रमाणे नोंदणी करा

  • सर्व प्रथम SBI च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जा.
  • त्यानंतर होम पेजवर उपलब्ध करिअर लिंकवर क्लिक करा.
  • आता एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे उमेदवारांना खाली स्क्रोल करावे लागेल आणि करंट ओपनिंग लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर एक नवीन पेज उघडेल जिथे SBI Clerk Recruitment 2023 लिंक उपलब्ध आहे.
  • यानंतर नोंदणी तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
  • त्यानंतर फॉर्म भरा आणि अर्जाची फी भरा.
  • त्यानंतर पेज सबमिट करा आणि डाउनलोड करा.
  • शेवटी त्याची हार्ड कॉपी पुढील गरजेसाठी तुमच्याकडे ठेवा.