Video : मुंबईच्या रस्त्यावर स्कूटीवरून फिरताना दिसले विराट आणि अनुष्का

WhatsApp Group

भारतीय फलंदाज विराट कोहली पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत स्कूटीवर मुंबईच्या रस्त्यावर पावसाचा आनंद लुटला Anushka Sharma, Virat Kohli scooter ride.विराट कोहली आणि अनुष्का एका जाहिरात फोटोशूटसाठी एका स्टुडिओत पोहोचले होते आणि यावेळी त्यांनी मुंबईच्या पावसाळ्यात स्कूटीवर रस्त्यावर काही वेळ घालवला, पण त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ओळखले आणि आता त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अॅड फोटोशूटसाठी पोहोचलेल्या विराट कोहलीने अनुष्काला स्कूटीवर बसवले आणि दोघेही मुंबईच्या रस्त्यावर फिरले. दोघांनी काळे हेल्मेट घातले होते, पण तरीही चाहत्यांनी त्यांना ओळखले. अनुष्का पूर्णपणे ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे. दुसरीकडे, किंग कोहलीने पांढऱ्या स्नीकर्ससह हिरवा शर्ट आणि काळी जीन्स घातली होती. या दोघांना कोणी ओळखू नये म्हणून दोघांनीही हेल्मेट घातल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीच्या वाईट टप्प्यातून जात असून त्याला शतक झळकावून एक हजार दिवस झाले आहेत. विराट कोहलीचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी झाले. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने 136धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीचे हे 70 वे शतक होते. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. तसेच सध्याच्या झिम्बाब्वे दौऱ्यावरही तो संघाचा भाग नाही. आता कोहली थेट आशिया कपच्या माध्यमातून संघात प्रवेश करेल. आशिया चषक या महिन्याच्या 27 तारखेपासून सुरू होत असून 11 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्या स्पर्धेत भारताला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.