OMG: कॅन्टीनच्या समोशामध्ये मुंग्या सापडल्या! दिल्ली विद्यापीठाचा व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

कॉलेजच्या दिवसांत कॅन्टीनमध्ये जाऊन मित्रांसोबत गप्पा मारत समोसा खाण्याची मज्जा वेगळीच असते. पण विचार करा या समोशात तुम्हाला मुंग्या सापडल्या तर? असेच काहीसे दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत घडले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

@du__india या Instagram पेजवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दोन समोसे दिसत आहेत, ज्यामध्ये बटाटा मसाल्यामध्ये मृत मुंग्या स्पष्टपणे दिसत आहेत. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “दयाल सिंग कॉलेजच्या समोशांमध्ये मुंग्या सापडत आहेत. मी आणि माझ्या मित्राने हे समोसे दयाल सिंग कॉलेजच्या कॅन्टीनमधून विकत घेतले होते.