वंदे भारत ट्रेनचा आणखी एक अपघात, गुजरातच्या वलसाडीमध्ये गायीची ट्रेनला धडक

WhatsApp Group

Vande Bharat Train Accident: गुजरातमधील वलसाडमध्ये वंदे भारत ट्रेनला पुन्हा एकदा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वलसाडच्या अतुलजवळ घडली. गाय वंदे भारत ट्रेनला धडकल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे ट्रेनच्या पुढील भागाचे नुकसान झाले. तसेच ट्रेनचा पुढील भाग तुटला आहे. त्याचवेळी रेल्वेच्या इंजिनाजवळील खालच्या भागात नुकसान झाले आहे. सध्या तरी कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

ही घटना सकाळी 8.17 च्या सुमारास वलसाडमध्ये घडली. अपघातानंतर वंदे भारत ट्रेन 30 मिनिटे थांबली. साडेनऊच्या सुमारास अतुल रेल्वे स्थानकावरून गाडी इच्छितस्थळी रवाना करण्यात आली. माहिती मिळताच रेल्वे विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. वंदे भारत ट्रेनच्या अपघातामुळे पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे.

यापूर्वी वंदे भारत ट्रेनला अहमदाबाद आणि आणंदजवळ अपघात झाला होता. त्यावेळी वंदे भारत गाडीचीही एका गायीला धडक बसली होती. 7 ऑक्टोबर 2022 रोजी गाडी गांधीनगरहून मुंबईकडे निघाली. ही घटना दुपारी 3.44 वाजता घडली आणि सुमारे 10 मिनिटे ट्रेन रोखून धरली. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रेनचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, समोरच्या कोचच्या नाकाच्या शंकूच्या कव्हरला म्हणजेच ड्रायव्हर कोचचे किरकोळ नुकसान झाले होते

याआधीही 6 ऑक्टोबर रोजी वंदे भारत ही ट्रेन गुजरातहून मुंबईला जात असताना रेल्वे अपघात झाला होता. ट्रेनचा वेग जास्त होता आणि त्याच दरम्यान अचानक 4 म्हशींचा कळप रुळावर आला. या अपघातानंतर ट्रेनच्या पुढील भागाचे पूर्ण नुकसान झालेले.