मुंबई – देशभरात पाच राज्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याबाहेरही आपली ताकद आजमावून पाहत आहे. अशातच आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव Chief Minister Chandrasekhar Rao यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे cm uddhav thackery यांची आज भेट घेतली. विशेष म्हणजे, यावेळी तेजस ठाकरे Tejas Thackeray यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळे तेजस ठाकरे सक्रीय राजकारणामध्ये सहभागी होतील का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आज सकाळी मुंबईमध्ये दाखल झाले. चंद्रशेखर राव यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी चंद्रशेखर राव आणि त्यांच्या सहकार्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला आहे.
With Chief minister of Telangana Shri K. Chandrashekar Rao ji @CMOMaharashtra @TelanganaCMO pic.twitter.com/ALzSeA8BgB
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 20, 2022
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या लहाने चिरंजीव तेजस ठाकरे हेहीयावेळी उपस्थितीत होते. खुद्द उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाची चंद्रशेखर राव यांना ओळख करून दिली आहे.