Joe Root: जो रूटचं आणखी एक दमदार शतक, आता विराट आणि स्मिथच्या खास विक्रमाशी केली बरोबरी

WhatsApp Group

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने अवघ्या 116 चेंडूत शतक पूर्ण केलं. या मालिकेतील त्याचे हे सलग दुसरे शतक आहे. त्याने याआधी लॉर्ड्स कसोटीत नाबाद 115 धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला आहे.

जो रूटनं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 27 वं शतक झळकावलं आहे. या कामगिरीसह त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) मोठ्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

जर आपण कसोटी क्रिकेटमधील महान फलंदाजांबद्दल बोललो, तर सर्वाधिक पसंतीच्या फलंदाजांमध्ये विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ 27-27 कसोटी शतकांसह पहिल्या क्रमांकावर होते. पण आता रूटने आता या दोन खेळाडूंची बरोबरी केली आहे. 119व्या सामन्यात रुटच्या बॅटने 27वे शतक झळकावले आहे. काही काळापासून रूटने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. रुटनं गेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये चार शतक ठोकली आहेत.