Heatstroke in Maharashtra:राज्यात उष्माघाताने आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

WhatsApp Group

अकोला – मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भामध्ये कमाल तापमानामध्ये प्रचंड वाढ (Temperature in maharashtra) झाली आहे. राज्यात सकाळी साडेनऊनंतरच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. अशात विदर्भामध्ये चंद्रपूरमध्ये सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद असून याठिकाणी कमाल तापमानाचा पारा 44.2 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.

चंद्रपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील सूर्याने प्रकोप केला आहे. सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांमुळे अनेकांना उष्माघाताच्या (Heatstroke in Maharashtra) समस्या जाणवत आहेत.

अशात कालजळगावमध्ये एका शेतकऱ्याचा उष्णाघाताने मृत्यू (farmer dies due to heatstroke) झाल्याची घटना समोर आली आहे. जितेंद्र संजय माळी असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या 33 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. ते जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यामधील मांडळ येथील रहिवासी होते.

घटनेच्या दिवशी जितेंद्र संजय माळी यांनी दुपारपर्यंत रस्त्यावर खमंग विकले होते. त्यानंतर भर उन्हामध्ये शेतातील काम केलं होतं. शेतातून काम करून घरी येत असतानाचं उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला.