अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पुन्हा स्फोट, 19 जण ठार

WhatsApp Group

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शुक्रवारी सकाळी मोठा स्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमधील एका शैक्षणिक संस्थेत हा स्फोट झाला. या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शुक्रवारी सकाळी हा स्फोट झाल्याची पुष्टी तालिबानच्या एका अधिकाऱ्याने केली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दश्ती बर्ची भागातील एका शिक्षण केंद्रात हा स्फोट झाला. तालिबानच्या वतीने गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी तकोर यांनी सांगितले की, पहाटे हा स्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

23 सप्टेंबर रोजी मशिदीत स्फोट झाला होता

या महिन्यात 23 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये स्फोट झाला होता. काबूलमधील एका मशिदीजवळ हा स्फोट झाला, ज्यात अनेकांचा मृत्यू झाला. या स्फोटात 4 जणांना जागीच जीव गमवावा लागला. याआधी सप्टेंबरमध्ये हेरात शहराजवळील मशिदीत स्फोट झाला होता.