बिहारमध्ये पुन्हा बोटीचा अपघात, वाळूने भरलेली बोट गंगा नदीत जेपी सेतूच्या खांबाला धडकली; 5 जण बेपत्ता

WhatsApp Group

बिहारची राजधानी पटना येथील दिघा पोलीस स्टेशन हद्दीतील जेपी सेतू पुलाच्या 12 क्रमांकाच्या पिलरला धडकल्याने वाळूने भरलेली एक बोट गंगा नदीत बुडाली. मणेरहून येणाऱ्या बोटीवर 13 मजूर होते. अपघातानंतर दोन जण पोहत बाहेर आले. तर छठ घाटाची स्वच्छता करणाऱ्या लोकांनी स्टीमरच्या मदतीने 6 जणांना वाचवले. सध्या 5 जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

रविवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. बुधवारीही दिघा पुलाच्या पिलरला धडकल्याने एक बोट उलटली. या बोटीतील 9 जणांची सुटका करण्यात आली. तर 2 जण अद्याप बेपत्ता आहेत.16 ऑक्टोबर रोजी कटिहार जिल्ह्यातही मोठी बोट दुर्घटना घडली होती. ब्रँडी नदीत बोट बुडाल्याने सात जणांचा मृत्यू झाला. तर तिघांनी पोहून जीव वाचवला होता.

पूर्व चंपारण जिल्ह्यातही आठवडाभरापूर्वी गंडक नदीत छोटी बोट बुडाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर 9 जणांना वाचवण्यात यश आले आहे. सर्वजण बोटीतून कामाला जात होते.