इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का; ICCने केली कारवाई

WhatsApp Group

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडने पाचव्या कसोटीत भारतावर ७ विकेट्स राखत दणदणीत विजय मिळवला त्यामुळे भारताचा WTC Finals चा मार्ग आता खडतर झाला आहे. त्यात आयसीसीने सामन्यातनंतर भारतीय संघावर कारवाई केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत षटकांची मर्यादा संथ ठेवल्यामुळे भारताला मॅच फीमधील ४० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. त्याचवेली WTC गुणांतील दोन गुण वजा करण्याचाही निर्णय आयसीसीकडून घेण्यात आला आहे.

भारताने विजयासाठी ठेवलेले ३७८ धावांचे लक्ष्य इंग्लंडने सहज पार केले. जॅक क्रॅवली ( ४६) व अॅलेक्स लीज ( ५६) यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या. त्यानंतर भारताने २ धावांच्या अंतराने तीन विकेट्स घेत कमबॅक केले. पण, जो रूट ( १४२*) व जॉनी बेअरस्टो ( ११४*) यांनी सर्व गणित बिघडवले. या दोघांनी ३१६ चेंडूंत २६९ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासोबत इंग्लंडने कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.

या पराभवानंतर भारतीय संघ ७७ गुणांसह WTC 23 Point Table मध्ये तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडने ६४ गुणांसह सातव्या स्थानावर कूच केली आहे. ऑस्ट्रेलिया ८४ गुण व ७७.७८ टक्क्यांसह अव्वल, तर दक्षिण आफ्रिका ६० गुण व ७१.४३ टक्क्यांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण, आयसीसीच्या कारवाईनंतर भारताचे ७७ गुण झाले आणि ५३.४७ अशी टक्केवारी झाली.

आता भारताला बांगलादेश दौऱ्यावरील दोन्ही कसोटी व मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चारही कसोटी जिंकाव्या लागतील, तरच ते भारताचा संघ कसोटीच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकणार आहे.