नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेली आणि दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाखों भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगनेवाडी मालवण येथील भराडी देवीची वार्षिक यात्रा आज आहे. मालवण मधील भराडी देवी ही अनेकांची कुलदैवत आहे दरवर्षी भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक मालवण मध्ये येतात. नेहमीप्रमाणे यंदाही भावी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कोकणातील लाखों भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील देवी भराडी मातेच्या यात्रेसाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातून लोक येतात.
लाखो भावीक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. देवीच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात वस्त्रालंकारांनी सजवलेली देवी याची देही याची डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. मालवण पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसुरे गावातील बारावाड्यात पैकी आंगणेवाडी एक वाडी आहे पण अशी भराडी देवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी एक गावच असल्याचा समज सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. साधारण तीनशे वर्षांपूर्वी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनी मोहिमेमध्ये भराडी देवीचा कृपाशीर्वाद लाभल्यामुळे त्यांनी 22 हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली होती.
इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची कथा आहे अंगणे नामक ग्रामस्थांची गाय नेहमी रानातील एका विशिष्ट ठिकाणी एका पाषाणावर पाना सोडत असे एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला त्याच दिवशी देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाचे पूजा करू लागले भरड भागातील एका राईt ही स्वयंपूर्ण देवी अवतरली म्हणून तिला बराडी देवी असे म्हणतात. या देवीची एक आख्यायिका सांगितले जाते की ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी या गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात. व तेथेच खायला सांगतात ते वडे तेथून आपल्या घरी आणता येत नाही. देवी जशी वड्यातून आली तशी वड्यातून बाहेर गेली तर अशी भीती वाटत असल्यामुळे ते वडे बाहेर नेऊ देत नाही.
