
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या वार्षिक क्रमवारीमध्ये भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, तर एकदिवसीयमध्ये न्यूझीलंडने अव्वल स्थान पटकावले.
कसोटीमध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत. इंग्लंडच्या खात्यात ८८ गुण असून, १९९५नंतर पहिल्यांदाच्या इंग्लंडचे इतके कमी गुण झाले.
India continue to reign at the top of the @MRFWorldwide ICC Men’s T20I Team Rankings after the annual update ????
Find out about the other teams’ movements ⬇️
READ: https://t.co/39uhT7XWDo pic.twitter.com/RWJC3R12EC
— ICC (@ICC) May 4, 2022
एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड अव्वल आहे. दुसऱ्या स्थानी इंग्लंड असून, तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे. भारत आणि पाकिस्तान अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाने अव्वल स्थान राखले आहे. यानंतर इंग्लंड आणि पाकिस्तान अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. दक्षिण आफ्रिका चौथ्या तर ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानी आहे.