
इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होत असताना बीसीसीआयने आगामी टी-२० आणि वन-डे मालिकेसाठीही भारतीय संघाची घोषणा केली आहे. कसोटी सामना झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ३ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे.
अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलं असून वन-डे संघात हार्दिक पांड्याने पुनरागमन केलं आहे. आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिकेमध्ये संधी मिळालेल्या उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग या तरुण खेळाडूंनाही इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळालं आहे.
NEWS 🚨 – #TeamIndia’s squad for T20I & ODI series against England announced.
More details 👇 #ENGvIND https://t.co/ii121ge0jY
— BCCI (@BCCI) June 30, 2022
टी-२० सामन्यासाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, रविंद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल आणि उमरान मलिक
वन-डे मालिकेसाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग
टी-२० आणि वन-डे मालिकेचं भारतीय संघाचं वेळापत्रक
- पहिली टी-२० : ७ जुलै – साऊदम्प्टन
- दुसरी टी-२० : ९ जुलै – बर्मिंघम
- तिसरी टी-२० : १० जुलै – नॉटिंगहॅम
- पहिली वन-डे : १२ जुलै – ओव्हल, लंडन
- दुसरी वन-डे : १४ जुलै – लॉर्ड्स, लंडन
- तिसरी वन-डे : १७ जुलै – मँचेस्टर