10वी आणि 12वीच्या दुसऱ्या टर्म परीक्षेच्या तारखा जाहीर, परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार

WhatsApp Group

नवी दिल्ली – देशात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CBSEपरीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. CBSE च्या परीक्षा 10वी आणि 12वीच्या दुसऱ्या टर्मच्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होतील. लवकरच सेंट्रल बोर्ड आपली डेटशीट जारी करेल.

विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण त्यांच्याकडे परीक्षांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ आहे. 5 जुलै 2021 रोजी, कोरोना साथीमुळे बोर्डाने दोन टर्ममध्ये बोर्ड परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. दरवर्षीप्रमाणेच विद्यार्थी परीक्षा केंद्रांवरून परीक्षेला बसतील.

CBSE प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकतात. मात्र, अद्याप बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा अधिकृतपणे जाहीर केलेल्या नाहीत.

बरेच दिवस विद्यार्थी दुसऱ्या टर्म थिअरी परीक्षांच्या तारखांची वाट पाहत होते. केंद्रीय बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात, मात्र गेल्या वर्षी या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. यावेळी दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्याचे ठरले.