अंकिता लोखंडेची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत, पाहा काळ्या साडीतील अंकिताचे सुंदर फोटो

WhatsApp Group

मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने ( Ankita Lokhande celebrates Makar Sankranti ) आपली लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली आहे. तसेच अंकिताने आपल्या दमदार लूकने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे .

अंकिता आपल्या इन्स्टा हँडलवर मकर संक्रांतीच्या सेलिब्रेशनची झलक शेअर केली आहे. अंकिताचे घर पतंग आणि फुलांनी सजले होते आणि अभिनेत्री स्वतः काळ्या आणि लाल सिल्कच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र आणि धान्यापासून बनवलेल्या पारंपरिक पदार्थांनी तिने तिचा लूक पूर्ण केला. अंकिताने घातलेल्या कमरबंदही खूपच आकर्षक होता.


नेहमीप्रमाणे यंदाही लोकांनी मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. मात्र, हा सण त्या जोडप्यांसाठी सर्वात खास ठरला आहे, ज्यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच हा सण साजरा केला.

टीव्ही इंडस्ट्रीमधील सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेनेही लग्नानंतर तिची पहिली मकर संक्रांती मोठ्या थाटामाटात साजरी केली, ज्याची झलक अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना दाखवली आहे.

 

अधिक बातम्या वाचा 

धक्कादायक बातमी: दारू पिल्याने पाच जणांचा मृत्यू

पुजारा आणि रहाणेला आता संघाबाहेर काढा, सोशल मीडियावर चाहत्यांची मागणी

24 तासांत भारतात आढळले 2 लाख 68 हजार 833 कोरोना रुग्ण, तर एवढ्या लोकांचा झाला मृत्यू