7 दिवसांनी सापडला अंकिता भंडारीचा मृतदेह, भाजप नेत्याच्या मुलासह तीन आरोपींना अटक

WhatsApp Group

उत्तराखंडच्या रिसॉर्टची रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी हिचा मृतदेह चिल्ला पॉवर हाऊसजवळ सापडला आहे. तराफ्याद्वारे शोध सुरू असताना, एसडीआरएफच्या पथकाने चिल्ला पॉवर हाऊसमधून एका मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि तो जिल्हा पोलिसांच्या ताब्यात दिला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अंकिता भंडारीच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले. नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे.

अंकिता भंडारी पौरी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर विधानसभा क्षेत्रातील एका खाजगी रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट होती. अंकिता 18 ते 19 सप्टेंबरपासून बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांनी रिसॉर्टचा संचालक आणि भाजप नेत्याचा मुलगा पुलकित आर्य याच्यासह तिघांना अटक केली आहे. या सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी विनोद आर्या यांचे पुत्र पुलकित यांच्यासह दोन साथिदारांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोपींनी पीडित तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या घटनेची ऑडिओ क्लिप असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा