‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल’ गाण्यावर अंजली अरोराचा डान्स, व्हिडीओ व्हायरल

WhatsApp Group

Anjali Arora: ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर डान्स व्हिडीओ शेअर करून रातोरात व्हायरल झालेली अंजली अरोरा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या एका डान्स व्हिडीओने अंजली अरोराच संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. यानंतर अंजली कंगना रनौतच्या ‘लॉकअप’ शोमध्ये देखील झळकली. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करणारी अंजली आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण ठरला आहे तिचा नवा डान्स व्हिडीओ. आता अंजली अरोराने दीपिका पदुकोणच्या ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल’ या गाण्यावर ठुमके लगावले आहेत. तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

सध्या ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल’ हे गाणे सध्या ट्रेंडमध्ये आहे. अनेक कलाकार या गाण्यावर डान्स व्हिडीओ तयार करत आहेत. आता अंजली अरोराने देखील या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंजली खूपच सुंदर दिसत आहे. तर, तिच्या डान्स मूव्ह देखील धुमाकूळ घालत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)