
रत्नागिरी : शिवसेना नेते व माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना आता कारवाईचे आदेश दिले आहे. याबाबत मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी बैठकीनंतर दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेला (Shivsena) पुन्हा धक्का दिला आहे. त्यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट पाडावे या फाईलवर सही केली आहे. यावर आज मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटीची जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक संपली आहे. त्यानंतर केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनी दिली आहे.
सी कॉन आणि साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला आहे. रिसॉर्ट पाडसंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.