
मुंबई – विधान परिषद निवडणुकीचा अटीतटीचा सामना सुरू असतानाच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते आणि पर्यवहन मंत्री अनिल परब यांनी ईडीकडून पुन्हा एकदा समन्स (Ed summons to Anil Parab) बजावण्यात आला आहे. ईडीने दुसऱ्यांदा अनिल परब यांना समन्स पाठवले असून उद्या चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी दोन वेळा इडीने परब यांची चौकशी केली आहे. आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी अनिल परब यांची सध्या चौकशी सुरू आहे.