देशमुखांना जामीन दिला तर ते फरार होतील – केतकी चितळे

WhatsApp Group

मुंबई – राज्यसभा निवडणुकीसाठी लवकरच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी मतदानाचा हक्क बजावण्याची जामीन मागितला आहे. पण, त्यांच्या या जामिनाला आता अभिनेत्री केतकी चितळेने (ketaki chitale) विरोध केला आहे. केतकीच्या याचिकेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

100 कोटी वसुली प्रकरणामध्ये अनिल देशमुख सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे. येत्या 10 जून रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जामीन अर्ज केला आहे. पण, अनिल देशमुखांच्या या जामीन अर्जाला आता केतकी चितळेनं विरोध केला आहे.

अनिल देशमुख यांना जामीन देवू नये. जर देशमुखांना जामिन दिला तर ते फरार होतील”, फरार झाले की ते पुन्हा मिळून येणार नाहीत, असा दावाच केतकीने केला आहे.