अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांची ईडीने चौकशी केली

WhatsApp Group

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी आज परकीय चलन नियमांचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानींच्या कंपन्यांमधील गुंतवणुकीशी संबंधित हे ताजे प्रकरण आहे, जे फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (FEMA), 1999 अंतर्गत दाखल करण्यात आले आहे. याआधी सोमवारी अनिस अंबानीही ईडीसमोर हजर झाले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट (फेमा) प्रकरणातही त्यांची चौकशी करण्यात आली होती.

अनिल अंबानी हे रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (ADAG) चेअरमन आहेत. अनिल अंबानी यापूर्वी 2020 मध्ये येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले होते.

याआधी ऑगस्ट 2022 मध्ये, आयकर विभागाने अनिल अंबानी यांना काळा पैसा विरोधी कायद्यांतर्गत दोन स्विस बँक खात्यांमध्ये ठेवलेल्या 814 कोटी रुपयांच्या अघोषित निधीवर 420 कोटी रुपयांच्या कथित करचोरीप्रकरणी नोटीस बजावली होती.