Andre Russell 6 Sixes: आंद्रे रसेल बनला सिक्सर किंग, सलग 6 चेंडूत ठोकले 6 षटकार

WhatsApp Group

Andre Russell 6 Sixes: जोरदार फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने शनिवारी पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे. सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स विरुद्धच्या सामन्यात त्रिनबागो नाईट रायडर्सकडून रसेलने दमदार खेळी खेळली. 6IXTY स्पर्धेच्या या सामन्यात आंद्रे रसेलने 24 चेंडूत 72 धावा करत आपल्या संघाला तीन धावांनी विजय मिळवून दिला, पण या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे या कॅरेबियन अष्टपैलू खेळाडूने सलग सहा चेंडूत 6 षटकार ठोकले आणि खेळच बदलून टाकला.

प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या TKR च्या विकेट लवकर पडल्या. अशा परिस्थितीत मोठी धावसंख्या करण्याची जबाबदारी आंद्रे रसेलच्या खांद्यावर होती. आंद्रे रसेलने सावध खेळ केला आणि नंतर गीअर्स बदलून सलग 6 षटकार ठोकले. 7व्या षटकात रसेलने डॉमिनिक ड्रेक्सच्या तिसऱ्या चेंडूवर पहिला षटकार मारला आणि पुढचे तीन चेंडू त्याच निकालासाठी पाठवले. जॉन-रश जगेसरच्या 8व्या षटकात रसेलने त्याच्यावर दयामाया दाखवली नाही आणि पहिल्या दोन चेंडूत दोन षटकार ठोकत सलग सहा षटकार पूर्ण केले. त्याने 24 चेंडूत 8 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 72 धावांची स्फोटक खेळी खेळली आणि 10 षटकांच्या या सामन्यात आपल्या संघाला 155 धावांपर्यंत नेले.

156 धावांचा पाठलाग करताना सेंट किट्सने चांगली फलंदाजी केली पण केवळ 3 धावांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आणि त्रिनिबागो नाइट रायडर्सने हा सामना जिंकला.

सेंट किट्सकडूनही जोरदार फलंदाजी झाली. सेंट किट्सकडून शेरफेन रदरफोर्डने 15 चेंडूत 50 धावा केल्या. त्याच्याशिवाय डॉमिनिक ड्रेक्सने 10 चेंडूत 33 आणि आंद्रे फ्लेचरने 15 चेंडूत 33 धावा केल्या. त्याच्या शानदार फलंदाजीनंतरही संघाला 152 धावाच करता आल्या.