
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मुरजी पटेल यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दिवंगत आमदार रमेश लट्टे यांच्या पत्नी ऋतुजा लट्टे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुरजी पटेल नववी पास पण करोडोंचे ते मालक आहेत तर ऋतुजा लटके या बीकॉम पास पण करोडपती आहेट. या निवडणुकीत शिंदे गटातील बाळासाहेबांची शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक ठरणार आहे. त्यामुळे केवळ भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली नसून, आपली ताकद अबाधित असल्याचे दाखवण्याची संधी उद्धव ठाकरेंना आहे. शनिवारी दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दोघांचे शिक्षण आणि संपत्तीबाबत रंजक माहिती समोर आली आहे.
मुरजी पटेल यांची एकूण संपत्ती 10 कोटी 41 लाख रुपये आहे. यातील 5 कोटी 4 लाख मुरजी पटेल यांच्या नावावर आहेत. उर्वरित 5 कोटींची मालमत्ता त्यांच्या मुलाच्या नावावर आहे. मुंबईतील अंधेरी येथे मुरजी पटेल यांच्या नावावर 3 फ्लॅट आहेत. याशिवाय मूळचे गुजरातमधील कच्छचे असलेले मुरजीभाई यांचीही कच्छमध्ये 30 एकर जमीन आहे. ही जमीन 2013-14 मध्ये 98 लाख रुपयांना खरेदी करण्यात आली होती. सध्या त्याची किंमत 4 कोटी 25 लाख रुपये आहे. या मालमत्तांशिवाय मुरजीभाई आणि त्यांच्या पत्नीच्या डोक्यावर 2 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
दुसरीकडे, ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या बीकॉम पदवीधर आहेत. त्यांनी बीएमसी लिपिक पदाचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच स्वीकारला आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, लटके यांच्याकडे 43 लाख 89 हजार 504 रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या मुलाच्या नावावर 12.35 एकर जमीन आहे. यासोबतच ऋतुजा लटके यांच्यावर 15 लाख 29 हजार रुपयांचे गृहकर्जही आहे. याशिवाय ऋतुजा लटके यांच्याकडे 75 हजारांची रोकडही आहे. त्यांच्या मुलाकडे 5 हजार रुपये रोख आहेत. याशिवाय ऋतुजा लटके यांच्याकडेही 51 लाखांची संपत्ती आहे. चिपळूणमध्ये त्यांच्या नावावर कायमस्वरूपी मालमत्ता म्हणून घर दाखवण्यात आले आहे.