शिंदे विरूद्ध ठाकरे पाहिल्यांदाच भिडणार निवडणूकीच्या रिंगणात; अंधेरी पोटनिवडणूक जाहीर; 3 नोव्हेंबरला मतदान

WhatsApp Group

3 नोव्हेंबरला पोटनिवडणूकी दरम्यान मुंबई मध्ये पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे गट भिडणार आहे. आमदार रमेश लटके यांचं12 मे रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त आहे त्यावर आता शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडून आपले उमेदवार उभे करण्यात आले आहेत. शिवसेनेने या जागेवर त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. तर भाजपतर्फे मुरजी पटेल हे उमेदवार असणार आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (Shivsena) विरुद्ध शिंदे गट (Shinde Group) असा सामना होणार होता. मात्र शिंदे गटाची ही जागा आता भाजपने आपल्याकडे घेतली आहे. पोटनिवडणुकीमध्ये भाजप आपला उमेदवार उभा करणार आहे. भाजपतर्फे मुरजी पटेल हे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे आता या पोटनिवडणुकीमद्धे शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना पहायला मिळणार आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा