
मुंबईत एका मॉडेलच्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका बोल्ड सीनच्या शूटिंगच्या बहाण्याने तिला न्यूड व्हिडिओ शूट करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप मॉडेलने केला आहे. व्हिडिओ शूट केल्यानंतर तिचा व्हिडिओ पॉर्न साइटवर व्हायरल करण्यात आला. 29 वर्षीय मॉडेलच्या तक्रारीनंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
यास्मिन खान, अनिरुद्ध प्रसाद जांगर, अमित पासवान आणि आदित्य अशी आरोपींची नावे आहेत. जांगर याला पोलिसांनी अटक केली आहे, तर अन्य 3 आरोपी फरार आहेत. मॉडेलने सांगितले की शूटच्या बदल्यात तिला 50,000 रुपयांची ऑफर देण्यात आली होती. राहुल पांडे नावाच्या व्यक्तीने मॉडेलला सांगितले की, त्याला त्याच्या एका मोबाइल अॅपसाठी मॉडेलची गरज आहे, ज्यामध्ये बोल्ड सीन्स करावे लागतील. पण जेव्हा मॉडेलला कळले की तिचे व्हिडिओ भारतातही रिलीज होणार आहेत, तेव्हा तिने ऑफर नाकारली.
नंतर पांडेने मॉडेलला सांगितले की व्हिडिओ त्याच्या परदेशी प्रेक्षकांसाठी शूट केला जाईल आणि तिला मालाडमधील भाब्रेकर नगरमधील एका इमारतीत घेऊन गेला जिथे एक महिला आणि एक मेकअप आर्टिस्ट उपस्थित होते. तेथे तिला नग्न होण्यास सांगितले परंतु मॉडेलने नकार दिल्याने यास्मिनने तिला 15 लाख रुपयांच्या मानहानीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. या भीतीपोटी मॉडेलने त्याच्या म्हणण्यानुसार सर्व शूट केले, ज्याचा व्हिडिओ नंतर इंटरनेटवर व्हायरल झाला. सीपी अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आता तपास सुरू केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.