Video: मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी टँकर नदीत कोसळला, चालकाचा मृत्यू

WhatsApp Group

रत्नागिरीतील लांज्याजवळ अंजनारी पुलावरुन एलपीजी टँकर उलटल्यामुळे मोठा अपघात झाला आहे. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या दूर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासांपासून विस्कळीत झाली आहे. टँकरमधील एलपीजी वायू सुरक्षितरित्या बाहेर काढल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. या अपघातामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हायवे क्रेनच्या साह्याने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा