India Vs Australia: सुपर ओव्हरमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमांचक विजय, स्मृती मानधनाची झंझावाती कामगिरी
India Women Vs Australia Women, 2nd T20: भारताच्या महिला क्रिकेट संघाने T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने रोमांचक विजय नोंदवला. सुपर ओव्हरमध्ये भारताने 1 गडी गमावून 20 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ 16 धावा करू शकला. स्मृती मानधना आणि ऋचा घोष यांनी टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने रेणुका सिंगला सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची संधी दिली. त्यांनी जबाबदारी चोख पार पाडली.
मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. बेथ मुनी आणि तालिया मॅकग्राच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 188 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 1 गडी बाद 187 धावा केल्या. मुनीने 54 चेंडूंत 13 चौकारांसह नाबाद 82 धावा केल्या आणि मॅकग्राने 51 चेंडूंत 10 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 70 धावा केल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी दीडशेहून अधिक धावांची भागीदारी केली.
प्रत्युत्तरात भारतीय संघानेही 20 षटकांत 5 गडी गमावून 187 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला. भारताकडून स्मृती मंधानाने 79, ऋचा घोषने 13 चेंडूत नाबाद 26, शेफाली वर्माने 34 आणि देविका वैद्यने 5 चेंडूत नाबाद 11 धावा केल्या.
INDIA WIN A THRILLER IN NAVI MUMBAI!
Smriti Mandhana and Richa Ghosh the heroes as the hosts level the series 1-1 and end Australia’s unbeaten run in T20Is in 2022 🙌 #INDvAUS
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 11, 2022