
गाझियाबाद येथील दौलतनगर कॉलनी, लोणी येथे 22 नोव्हेंबरच्या रात्री भंगार व्यापारी इब्राहिम (62) आणि त्याची पत्नी हाजरा (58) यांची चार भंगार विक्रेत्यांनी 54,000 रुपये लुटण्यासाठी हत्या केली होती. या हत्येमध्ये चारपैकी एक 12 वर्षांचा मुलगा सामील आहे. वृद्ध दाम्पत्याच्या कट हा त्यानेच रचला होता. हा धक्कादायक खुलासा करत पोलिसांनी 12 वर्षीय मुलासह तिघांना अटक केली आहे. या दुहेरी हत्याकांडात या दाम्पत्याच्या जवळच्या व्यक्तीचा हात असल्याचा अंदाज 25 दिवसांपासून पोलीस घेत होते, मात्र 12 जणांची चौकशी करूनही कोणताही सुगावा लागला नाही. यानंतर जोडप्याच्या शेजाऱ्यांनी मुलाबाबत सांगितले. त्याची चौकशी करताच प्रकरण उघड झाले. दाम्पत्याच्या हत्येचा कट अल्पवयीन मुलाने रचला होता. असं डीसीपी डॉ. इराज राजा यांनी सांगितले आहे.
पोलिसांनी या चार आरोपीकडून सुमारे 12 हजार रुपये, मोबाईल आणि गळ्यातील चेन असा ऐवज जप्त केला आहे. दाम्पत्याच्या घरातून 70 हजार रुपये, मोबाईल फोन आणि दागिने लंपास करण्यात आला. घटनेच्या वेळी या दाम्पत्याची मुलगी रहिमा आणि तिची सहा मुले घरात होती. घटनेच्या वेळी आपल्याला याची कल्पना आली नसल्याचे त्यांनी सांगितले.