
कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या चितेची तयारी करुन एका वृद्ध दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वेतवडे गावामधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
आजारपणाला कंटाळून दाम्पत्याने हे टोकाचं पाऊस उचललं असं सांगण्यात येत आहे. महादेव पाटील आणि द्वारकाबाई पाटील अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावं आहेत.
आत्महत्येआधी या वृद्ध दाम्पत्याने चितेला लागणारं सर्व साहित्य आणून ठेवलं होतं. आजारपणाला कंटाळून या दाम्पत्याने गळफास घेऊन जीवन संपल्याची माहिती समोर आली आहे.