धक्कादायक: पिंपरी- चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार करून हत्या

WhatsApp Group

पिंपरी-चिंचवड येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एक आठ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. पवन पांडे असे आरोपीच नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. आरोपीने अल्पवयीन मुलाचे अपहरण करून पुण्याच्या पाषाण परिसरात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत त्याची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे हा वकड येथील एका रसवंतीगृहात कामाला आहे. त्याची आठ वर्षीय अल्पवयीन मुळाशी काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. या रसवंती समोर काही लहान मुले खेळत असायची. यात खून झालेल्या आठ वर्षीय अल्पवयीन मुलगाही यायचा. आरोपी पांडेने त्याच्याशी ओळख केली.

यानंतर त्याच्याशी जवळीक साधली. पांडे मुलांना रसवंतीगृहात बोलावत त्यांना रस प्यायला द्यायचा. यामुळे खून झालेय मुलाची आणि आरोपीची जवळीक वाढली. याचा फायदा घेऊन पांडे याने शनिवारी रात्री ८ च्या सुमारास अल्पवयीन मुलाचे अपहरण केले. त्याला पाषाण येथे फिरायला नेले. या ठिकाणी त्याने मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. दरम्यान, आपले बिंग फुटू नये यासाठी त्याने मुलाची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह पाषाण तलावात फेकून दिला.