जपानला भूकंपाचा धक्का; आतापर्यंत चार जणांचा मृत्यू तर 97 हून अधिक जण जखमी

WhatsApp Group

जपानमध्ये रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या जोरदार भूकंपामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 97 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येतं आहे. भूकंपाची तीव्रता 7.4 एवढी होती. उत्तर जपानच्या फुकुशिमा किनाऱ्याला भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रसपाटीपासून 60 किमी खाली होता.

लाखो घरांमध्ये वीजपुरवठा खंडित

भूकंपामुळे सुमारे दोन लाख घरांची वीज गेली आहे. शहरात अंधार पडला आहे . तसेच अनेक घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. भूकंपानंतर सुनामीचा इशाराही देण्यात आला होता, मात्र तो नंतर मागे घेण्यात आला.जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी गुरुवारी सकाळी संसदीय अधिवेशनात सांगितले की, भूकंपात चार जणांचा मृत्यू झाला आहे. माहिती देताना ते म्हणाले की, भूकंपामुळे 97 जण जखमीही झाले आहेत.

अनेक इमारतींचे नुकसान

भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या तुटलेल्या भिंती जमिनीवर पडताना दिसत होत्या. फुकुशिमा शहरात खिडक्यांचे तुकडे पडले आहेत. अनेक रस्तेही तुटले आहेत.

22 जानेवारीलाही भूकंप झाला होता

यापूर्वी 22 जानेवारीलाही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. 22 जानेवारीला झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.4 एवढी होती. या भूकंपात 10 जण जखमी झाले आहेत. नैऋत्य आणि पश्चिम जपानला झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू 40 किलोमीटर (24.8 मैल) खोलीवर होता.