Imran Khan : इम्रान खान यांचा अश्लील संभाषणाचा ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल

WhatsApp Group

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नव्या वादात सापडले आहेत. व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये एक पुरुष एका महिलेशी ‘अश्लील बोलत’ असल्याचे ऐकू येत आहे. हा व्यक्ती इम्रान खान असल्याचा दावा केला जात आहे. मात्र इम्रान खान यांच्या पक्षाने ही ऑडिओ क्लिप बनावट असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानी पत्रकार सय्यद अली हैदर यांच्या यूट्यूब चॅनलवर कॉल रेकॉर्डिंगचे दोन भाग लीक झाले आहेत. ऑडिओ क्लिपमध्ये एक पुरुष (कथित इम्रान खान) एका महिलेशी अपशब्द बोलतांना ऐकू येत आहे. ही क्लिप पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयातील असल्याचा दावाही केला जात आहे. पहिल्या ऑडिओमध्ये इम्रान खान ज्या महिलेसोबत बोलत आहेत ती त्यांच्या पक्ष पीटीआयशी संबंधित असल्याचे मानले जात आहे.

यापूर्वीही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

याआधीही इम्रान खान यांचे कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. ऑक्टोबरमध्ये, इम्रान खान यांचा एक कथित ऑडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ते संसदेतील अविश्वास ठरावातून खासदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत होते.