कर्नाटकातील बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने चॉकलेट आणून न दिल्याने एका महिलेने गुरुवारी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. महिलेचा पती सलूनमध्ये काम करायचा. महिलेचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता.
एएनआय न्यूज एजन्सीनुसार, गुरुवारी सकाळी पती नेहमीप्रमाणे सलूनमध्ये जाऊ लागला तेव्हा पत्नीने त्याच्याकडे चॉकलेट मागितले. मात्र पतीने पत्नीच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही गोष्ट पत्नीच्या मनात घर करून गेली आणि तिने इतका मोठा निर्णय घेतला. यामुळे दुखावलेल्या पत्नीने दुपारी खोलीत गळफास लावून घेतला.
चॉकलेट न मिळाल्याने पत्नी नाराज
संध्याकाळी कामावर निघताना पतीने तिला फोन केला, मात्र तिने फोन घेतला नाही. सलूनमधून परतल्यावर पती घरी पोहोचला आणि खोलीत गेला तेव्हा पत्नीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
घरी पोहोचल्यावर तिला ती मृत दिसली. याप्रकरणी हेन्नूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्व विभागाचे डीसीपी भीमा शंकर गुलेड यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. सध्या पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.