मुंबई : पवई येथील आयआयटी येथे केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने वसतिगृह इमारतीच्या 7 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दर्शन सोलंकी (१८) असं या मुलाचं नावं आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.
दर्शनसोलंकी हा मूळचा अहमदाबादचा होता, पवईच्या आयआयटीमध्ये तो तीन महिन्यांपूर्वी शिक्षण घेण्यासाठी आला होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वसतिगृहाच्या खिडकीत असलेल्या आणखी एका मित्राने दर्शन सोलंकी सातव्या मजल्यावरील रिफ्युज एरियाच्या काठावर जाताना पाहिले.
पोलिसांनी सांगितले की, दर्शन सोलंकी आपल्या मित्रांसोबत फारच कमी बोलायचा. त्याच्या रूम पार्टनरसोबतही तो जास्त बोलत नसे. त्याने एकटेपणाला कंटाळून हा निर्णय घेतला असं पोलिसांचं म्हणन आहे.