औरंगाबाद – अभ्यासाच्या तणावातून बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय मुलीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उषा कृष्णाचंद्र चौधरी असं या गळफास घेतलेल्या मुलीचं नाव आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली आहे.
घरात कुणी नसल्याचे बघून उषाने साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार घरच्यांना समजताच त्यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बारावीचे शिक्षण घेत असलेल्या उषाने ही आत्महत्या अभ्यासाच्या तणावातूनच केली आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये परीक्षेतील अपयशामुळे किंवा अभ्यासाच्या भितीन नैराश्य येऊन आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आपल्या पाल्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे न लादता त्यांच्याकडे योग्य ते लक्ष देऊन त्यांना समजून घेणे पालकांसाठी खूप महत्वाचे बनले आहे.
हेही वाचा
24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम
जगातील सर्वात उंच इमारतीवर चढली ‘ही’ महिला, धोकादायक स्टंट पाहून लोक झाले अवाक