अहमदाबाद – कोरोना काळात देशातील जनता महागाईनं त्रस्त झालीय. पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. त्याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर झाला आहे. यातच देशातील प्रसिद्ध अमूल ब्रँडनं आपल्या दुधाच्या किंमतीत दोन रुपये प्रतिलिटरनं वाढ केली आहे AMUL increases the price of milk by Rs 2. उद्यापासून म्हणजेच 1 मार्चपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
AMUL increases the price of milk by Rs 2. The prices will come into effect from tomorrow (March 1, 2022) pic.twitter.com/R2IeDQFtOo
— ANI (@ANI) February 28, 2022
गुजरात सहकारी दूध विपणन संघाने एका वर्षात दुसऱ्यांदा दुधाच्या किंमतीत वाढ केली आहे. ही दरवाढ आता अमूल सोना, अमूल ताजा, अमूल शक्ती, अमूल टी-स्पेशलसह अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर लागू करण्यात येणार आहे. कच्चा मालाच्या खर्चात वाढ होत असल्याने अमूलने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. यापूर्वी अमूलनं जुलै 2021 ला दुधाच्या किंमतीत वाढ केली होती. या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडलंय.
अमूल ही देशातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी असून त्यांनीच आता आपले दर वाढवले असल्याने मदर डेअरीसह इतर कंपन्याही आपल्या दुधाच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुधाच्या किंमतीत वाढल्याने दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चहा, कॉफी, मिठाईशिवाय तूप, पनीर, चीज, लस्सी यांचेही भाव वाढण्याची शक्यता आहे.