
मुंबई – राज्यात भोंग्यावरून सुरू असलेलं राजकारण हळूहळू चांगलंच तापत चाललं आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या नेहमीच महाविकास आघाडी असो की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नेहमीच निशाणा साधत असतात. त्यातच आज अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून (twitter) पुन्हा एकदा भोंग्यावरून ठाकरे सरकारला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज योगी सरकारचे कौतुक केळे आहे. तसेच महाराष्ट्रात सत्तेचे भोगी आहेत असं म्हणत ठाकरे सरकारला अप्रत्यक्षपणे तिखट टोला लगावला आहे.
आज सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भोंगे हटाव मोहिमेबाबत कौतुक केलं, त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी देखील योगीचं कौतुक करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से !#Maharashtra #thursdayvibes
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 28, 2022
अमृता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले आहे. “ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से!” असं म्हटलं आहे. तसेच Maharashtra आणि thursdayvibes हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.