
Amruta Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर खूपच जास्त सक्रिय असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या नहमीच चर्चेत असतात. नुकतेच अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘वो तेरे प्यार का गम’ (Woh Tere Pyar Ka Gham) असे या गाण्याचे नाव आहे.
युट्युबवर व्हायरल झालेल्या वो तेरे प्यार का गमची चाहते बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत होते. ते गाणं केव्हा प्रदर्शित होणार याविषयी अमृता यांनी माहितीही दिली होती. आतापर्यत या गाण्याला 15 लाख व्ह्युज मिळाले आहे. सारेगमपच्या वतीने त्या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.