‘आज मैंने मूड बना लिया है…’, अमृता फडणवीसांनी केला जबरदस्त डान्स, नवीन गाण्याची होतेय चर्चा

WhatsApp Group

मराठी गायिका अमृता फडणवीस आपल्या सुरेल आवाजाने चाहत्यांची मने जिंकत आहेत. ‘शिव तांडव स्तोत्रम’, ‘मोरया रे’, ‘वो तेरे प्यार का गम’ आणि ‘तेरी बन जाऊंगी’ यांसारख्या गाण्यांनी नावलौकिक मिळवलेल्या अमृता फडणवीस यांनी आता आज मैंने मूड बना लिया है’ हे नवीन गाणे सादर केले आहे. अमृता फडणवीस यांनी या गाण्यात आपल्या आवाजाने आणि नृत्याने सोशल मीडिया यूजर्सची मने जिंकली आहेत. त्यांच्या या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळत आहेत.

अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. त्यांचे हे नवीन गाणे टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर शुक्रवारी रिलीज झाले, जे काही मिनिटांतच व्हायरल झाले. मीट ब्रदर्ससोबत अमृता यांनी तालावर डान्स केला. गाण्यांमध्ये अमृता फडणवीस वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसत आहे. या गाण्यात टीव्ही कलाकार अविनाश मिश्रा आणि मेहक घई देखील दिसत आहेत. हे गाणे रिलीज झाल्यापासून अमृता फडणवीस यांच्या लूक, टोन आणि डान्सची सर्वत्र चर्चा होत आहे. Little Girls Dance: ‘मेरे सपनो की रानी’ गाण्यावर चिमुरडीचा जबरदस्त डान्स, Video होतोय व्हायरल

टी-सीरीजचे ‘आज मैंने मूड बना लिया है’ हे गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. मीट ब्रदर्ससोबत अमृता फडणवीस यांनीही गाण्यांना आवाज दिला आहे. या गाण्याला काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले की, ‘मी हे गाणे ऐकून थांबू शकत नाही, खूप छान गाण आहे’. याशिवाय अनेक यूजर्स अमृता फडणवीस यांच्या डान्स मूव्ह्सचे कौतुक करत आहेत.