Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले… अमृता फडणवीसांची ठाकरे सरकार टीका

WhatsApp Group

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टीव असतात. अनेकदा त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करत असतात. दरम्यान आता त्यांनी राज्य सरकारने वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्याच्या निर्णयावरून ठाकरे सरकार टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत सरकार वर निशाणा साधला आहे.


अमृता फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “थोडक्यात उत्तर द्यावे …५० मार्क्स ; Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले ….. या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो …५० मार्क्स ! __शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब __है और सुनने में आया है ___नामर्द है !”