Viral Video: अमृतसरी वड्यांच्या नावाखाली ‘विष’ तर खात नाहीये ना? फॅक्टरीमधील अस्वच्छतेचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

जेवणाची चव वाढवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘अमृतसरी वड्या’ (Famous Amritsari Wadiyan) घराघरात आवडीने खाल्ल्या जातात. मात्र, या वड्या फॅक्टरीमध्ये कशा तयार होतात, याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून त्याने खवय्यांचे अक्षरशः होश उडवले आहेत. प्रसिद्ध फूड ब्लॉगर अमर सिरोही याने इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून, लोक आता या वड्या विकत घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करत आहेत. स्वच्छतेच्या नियमांची ऐशीतैशी करणाऱ्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

नंगे पाय आणि गंजलेल्या मशिनरी

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वड्या बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे, जी अत्यंत घृणास्पद आहे. वड्यांचे पीठ मळण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन जुनी आणि गंजलेली आहे. ज्या जमिनीवर मसाला आणि पीठ मिसळले जात आहे, त्याच जमिनीवर कामगार उघड्या पायाने फिरत आहेत. फरशीवरच पिठाचा गोळा तयार करून वड्या बनवल्या जात असल्याचे पाहून अनेकांनी कपाळावर हात मारून घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amar Sirohi (@foodie_incarnate)

स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव

केवळ पीठ मळतानाच नाही, तर वड्यांना आकार देतानाही स्वच्छतेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. कामगार कोणत्याही हॅन्ड ग्लव्सशिवाय (Hand Gloves) घाणेरड्या हातांनीच वड्यांना आकार देत आहेत. धक्कादायक म्हणजे, या वड्या सुकवण्यासाठी उघड्या छतावर ठेवल्या जातात, जिथे दिवसभर धूळ आणि माती वड्यांवर साचते. फूड ब्लॉगरने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत २६ लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये युजर्सने आपली नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिले की, “हे माणसांना काय, प्राण्यांनाही खायला देऊ नका.” दुसऱ्या एका युजरने संताप व्यक्त करत म्हटले की, “धुळीचे थर, पायांचे ठसे आणि गंजलेली मशिनरी, हा चवीच्या नावाखाली विषाचा प्रकार आहे.” अनेक युजर्सनी आता बाहेरच्या खाद्यपदार्थांवरील विश्वास उडाल्याचे म्हटले आहे. पॅकेज्ड फूडच्या नावाखाली लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा फॅक्टरींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.