Amou Haji Died: जगातील सर्वात घाणेरडया व्यक्तीचा मृत्यू, वयाच्या 94 व्या वर्षी अंघोळ केल्यावर झाला मृत्यू

जगातील सर्वात घाणेरडी व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे इराणी नागरिक अमौ हाजी यांचे निधन झाले आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमौ हाजीने गेल्या साडेसात दशकात तोंडही धुतले नव्हते. अमो 94 वर्षांचे होते. वयाच्या 20 व्या वर्षापासून त्यांनी कधीही आंघोळ केली नव्हती. अमौ हाजी हे इराणच्या दक्षिणेकडील देगाह गावात राहत होते.
अमौ हाजी आंघोळ न करण्याचे निमित्त शोधत असे. ते वयाच्या 20 साव्या वर्षांनंतर नंतर आंघोळ न करता ते राहू लागले. काही महिन्यांपूर्वी अमोला गावातील लोकांनी त्यांना जबरदस्तीने अंघोळ घातली होती. तेव्हापासून त्यांची तब्बेत बिघडली होती. दशकांनंतर अंघोळ केल्यावर काही महिन्यांतच अमो यांचा मृत्यू झाला. अमौ हाजीचे संपूर्ण शरीर धूळ आणि राखेने झाकलेले होते. धुराच्या लोटातून बाहेर आल्यावर अमौ हाजीची त्वचा काळी पडली होती.
‘World’s dirtiest man’ Amou Haji dies shortly after taking first bath in decades
Read @ANI Story | https://t.co/DnQbICR1q7#WorldsDirtiestMan #AmouHaji #AmouHajiDies pic.twitter.com/bq1njL5RyQ
— ANI Digital (@ani_digital) October 25, 2022
पाण्याची भीती वाटायची
अमौ हाजीला पाण्याची खूप भीती वाटत होती. म्हणूनच तो आंघोळ न करताच राहत होता. अंघोळ केली तर आजारी पडेन असे अमोला वाटायचे. आमोची राहणीमान अतिशय विचित्र होती. त्यांना प्राण्यांचे कुजलेले मांस खायला आवडायचे. तो एकावेळी पाच सिगारेट ओढायचा. त्याची धूम्रपानाची सवय त्याच्या जीवनशैलीइतकीच घृणास्पद होती.अमो हाजी थंडीपासून बचाव करण्यासाठी डोक्यावर हेल्मेट घालत असे. तो अग्नीच्या सहाय्याने अंगावरील केस कापत असे. गावात त्याचे घर नव्हते. अमो आयुष्याच्या शेवटपर्यंत एकटाच राहिला.
अमौ हाजी यांच्या आयुष्यावर एक डॉक्युमेंट्री देखील तयार करण्यात आली आहे. 2013 साली त्यांच्या जीवनावर आधारित ‘द स्ट्रेंज ऑफ अमौ हाजी’ ही एक शार्ट डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली होती. यामध्ये त्यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली होती. अमौ यांच्या निधनानंतर आता त्यांचे अनेक फोटोज व्हायरल होत आहेत.