जगातील सर्वात सुंदर ३० पर्यटन स्थळांमध्ये भारतातील ९ स्थळांचा तर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याचा समावेश
कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची 30 beautiful tourist destinations यादी जाहीर केली आहे. यामध्ये लंडन, सिंगापूर यासह इस्तांबूल, सिसिली, केपवर्दे, इजिप्त, माल्टा, सर्बिया, अशा आंतरराष्ट्रीय तसेच ओरिसा, सिक्कीम, कोलकाता, मेघालय, गोवा, राजस्थान, भिमताल, केरळमधील आयमानम अशा भारतातील ९ पर्यटन स्थळांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश करण्यात आला आहे.
जगातील सर्वात सुंदर ३० पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये सिंधुदुर्गचा Sindhudurg District समावेश असणे ही खरोखरच आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.
यावर्षी भेट देण्यासाठी निवडण्यात आलेल्या ३० पर्यटन स्थळांमध्ये भारतातील ९ स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी महाराष्ट्रामधून एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा आहे. या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड होणे म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा असल्याचेआता शिक्कामोर्तब झाले आहे.
स्वच्छ सुंदर किनारे, समुद्रातील प्रवाळ, सिंधुदुर्ग किल्ला, त्सुनामी आयलंड या सारख्या पर्यटनस्थळांविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. तसेच स्कुबा डायव्हिंगची सोय, समुद्री जीवनाचे दर्शनाची सोयही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन सोपे झाल्यामुळे जागतिक पर्यटनाच्या नाकाशावर सिंधुदुर्ग पोहचला आहे.