Video: अमिताभ बच्चन यांनी ख्रिस्तियानो रोनाल्डोची घेतली भेट, मेस्सीचे केलं अभिनंदन

WhatsApp Group

शतकातील सुपरहिरो म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांना क्रिकेट खेळाचे वेड आहे हे सर्वांनाच माहीत आहे. बिग बींनाही फुटबॉल या खेळात रस आहे का? याची माहिती गुरुवारी चाहत्यांना मिळाली. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अमिताभ बच्चन यांनी फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची भेट घेतली.

ब्राझीलचा रोनाल्डो आणि पॅरिस सेंट जर्मेन (PNG)चा लिओनेल मेस्सी आमनेसामने होते. निमित्त होते फ्रेंच क्लब पीएसजी आणि अल-नसर आणि अल हिलाल या दोन सौदी अरेबियाच्या क्लबमध्ये सामील होऊन तयार झालेला संघ यांच्यातील फुटबॉल सामन्याचे. यादरम्यान अमिताभ बच्चनही कार्यक्रमात दिसले. हा सामना पाहण्यासाठी त्यांना सौदी अरेबियातून प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते.

बिग-बीने ब्राझीलच्या नेमार जूनियर आणि तरुण फ्रेंच फुटबॉलपटू किलियन एमबाप्पे यांच्याशी हस्तांदोलन केले. यानंतर ते लिओनेल मेस्सीला भेटले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांनी रोनाल्डो आणि मेस्सीशी हस्तांदोलन केल्यानंतर काही सेकंद बोलल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते.

अमिताभ बच्चन यांनी मेस्सीचे विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन केल्याचे मानले जात आहे. गेल्या महिन्यात कतार येथे खेळल्या गेलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या जेतेपदाच्या लढतीत मेस्सीच्या अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता.