बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन Amitabh Bachchan चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. अमिताभ बच्चन यांनी ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन म्हणाले, ‘हैदराबादमध्ये प्रोजेक्ट केच्या शूटिंगदरम्यान अॅक्शन सीन शूट केला जात होता. त्यादरम्यान ते जखमी झाले. त्यांच्या बरगडीला दुखापत झाली आहे. शूट रद्द करण्यात आले आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्येही स्कॅन करण्यात आले आहे.
‘प्रोजेक्ट के’ हा अॅक्शनपट आहे. नाग अश्विनने याचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटनी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची रिलीज डेट 12 जानेवारी 2024 आहे. हा एक जबरदस्त अॅक्शन चित्रपट आहे ज्यामध्ये उच्च पातळीवरील अॅक्शन पाहायला मिळणार आहे. असाच एक अॅक्शन सीन शूट करताना अमिताभ बच्चन जखमी झाले.
“In Hyderabad at shoot for Project K, during an action shot, got injured, rib cartilage popped broke & muscle tear to the right rib cage. Cancelled shoot, did doctor consult & scan by CT at AIG Hospital in Hyderabad & flown back home,” posts Amitabh Bachchan.
(pic 2: file pic) pic.twitter.com/BqHu6yKirL
— ANI (@ANI) March 6, 2023
बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, “हैदराबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ च्या शूटिंगदरम्यान, अॅक्शन शॉट दरम्यान, मला दुखापत झाली. शूट रद्द करण्यात आले आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि एआयजी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन केले. मी हैदराबादहून घरी परतलो आहे. बाकीचे उपचार सुरू आहेत. हालचाल आणि श्वास घेण्यास थोडा त्रास होत आहे, बरे होण्यासाठी काही आठवडे लागतील.
ते पुढे म्हणाले, “दुखापतीमुळे जे काम करायचे होते ते सध्या थांबवण्यात आले आहे. उपचार पूर्ण होईपर्यंत सर्व काम बंद राहणार आहे. सध्या मी जलसामध्ये विश्रांती घेत आहे.